पुणे: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने परिसरात केलेल्या धडक कारवाईत तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. १७ आणि १९ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिली कारवाई १७ ऑगस्ट २०२६ रोजी वडगाव बुद्रुक येथील रेणुकामाता मंदिरासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि सागर शेडगे यांना खबर मिळताच तपास पथकाचे प्रभारी उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून सुरज उर्फ चिक्या संतोष गायकवाड (वय १८, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) आणि ओमकार उर्फ दादया अशोक पांढरे (वय १८, रा. दत्तमंदिर जवळ, सिंहगड कॅम्पस, वडगाव बुद्रुक) यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत दोघांकडून प्रत्येकी एक गावठी पिस्तूल (किंमत ४०,००० रुपये) आणि प्रत्येकी एक जिवंत काडतूस (किंमत १,००० रुपये) असे दोन पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी आर्म ॲक्टसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास उप निरीक्षक प्रवीण कुलकर्णी करत आहेत.
दुसरी कारवाई १९ ऑगस्ट २०२६ रोजी वडगाव बुद्रुक येथील जाधव प्रवेशद्वाराच्या आतील वॉकिंग ट्रॅकवर करण्यात आली. पोलीस अंमलदार माळवदकर यांना मिळालेल्या बातमीनुसार, तपास पथकाने तेथे छापा मारून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीदरम्यान ४०,००० रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि २,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्धही सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उप आयुक्त (परिमंडळ ३) डॉ. सागर कवडे, सहआयुक्त (सिंहगड रस्ता विभाग) विजय कुंभार, वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर आणि निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, संतोष भांडवलकर, सचिनकुमार तरडे व अंमलदार उत्तम तारू, अण्णा केकाण, सतीश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, समीर माळवदकर, संदीप कांबळे, तानाजी सागर आणि शिरीष गावडे यांच्या पथकाने पार पाडली.
Labels: Pune Police, Sinhagad Road Police Station, Crime Branch Pune, Illegal Arms Seized, Pistol Seizure Pune, Pune Crime News
Search Description: Sinhagad Road Police in Pune arrested two record offenders and detained a juvenile, recovering three pistols and four live cartridges in Vadgaon Budruk.
Hashtags: #PunePolice #SinhagadRoadPolice #PuneCrime #IllegalWeapons #PistolSeized #MaharashtraPolice #BreakingNews #CrimeNews
वडगाव बुद्रुक परिसरात शस्त्रांसह वावरणाऱ्या दोन दाखलेबाज गुन्हेगारांना पडकले!; १ अल्पवयीनही ताब्यात
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२६ ०७:१८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: