डेक्कन परिसरातील सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नातील दोन वर्षांपासून पसार आरोपींना गुन्हे शाखेकडून अजिंठा येथून बेड्या


पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नातील आणि बीट मार्शलवर हल्ला करून पसार झालेल्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाला यश आले आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा परिसरातील दुर्गम जंजाळा गावातून करण्यात आली. शाहरुख कदीर खान पठाण (वय २८) आणि फारुख कदीर खान पठाण (वय २६, दोघे रा. जंजाळा, ता. अजिंठा, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही घटना २४ ऑक्टोबर २०२४ रोजी डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिनव पथ येथे घडली होती. सहा जण सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असताना बीट मार्शलने त्यांना अटकाव केला होता. त्यावेळी आरोपींनी बीट मार्शलवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. प्रत्युत्तरादाखल बीट मार्शलने त्यांच्या दिशेने दोन फ़ैरी झाडल्या होत्या. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी वास्तव्यास असलेला परिसर डोंगराळ व घनदाट जंगलाचा असल्याने त्यांना पकडण्यात अडचणी येत होत्या.

गुन्हे शाखा युनिट ५ चे निरीक्षक वाहीद पठाण यांना आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्याआधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पथक अजिंठा येथे दाखल झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन अंबई जवळील जंजाळा गावातील दुर्गम भागात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 

ही धडक कामगिरी आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे, अप्पर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सह. आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीपान पवार, निरीक्षक वाहीद पठाण, उप निरीक्षक अभिजीत पवार, दत्तात्रय काटम, संदीप जाधव, अंमलदार शहाजी काळे, प्रताप गायकवाड, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, नासेर देशमुख, सुधीर सोनवणे, अविनाश इंगळे, कुलदीप पवार, शशिकांत नाळे, राहुल गोसावी, नेत्रिका अडसुळ, जयश्री भालेराव, श्रीदेवी फाळके व मयुरी पालवे यांच्या पथकाने केली.


  • Labels: Pune Police, Crime Branch Pune, Crime News Pune, Deccan Police Station, Chhatrapati Sambhajinagar, Police Action

  • Search Description: Crime Branch Unit 5 of Pune Police arrested two absconding accused from Ajanta in Chhatrapati Sambhajinagar involved in the 2024 Deccan armed dacoity attempt and attack on police marshal.

  • Hashtags: #PunePolice #CrimeBranch #PuneCrime #DeccanCrime #PoliceAction #BreakingNews #MaharashtraPolice #ChhatrapatiSambhajinagar

डेक्कन परिसरातील सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नातील दोन वर्षांपासून पसार आरोपींना गुन्हे शाखेकडून अजिंठा येथून बेड्या डेक्कन परिसरातील सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नातील दोन वर्षांपासून पसार आरोपींना गुन्हे शाखेकडून अजिंठा येथून बेड्या Reviewed by ANN news network on ८/२२/२०२६ ०७:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".