पुणे: पुण्यातील हडपसर परिसरात एका फ्लॅटमधून ७ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. हडपसर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत अवघ्या काही दिवसांत या चोरीचा छडा लावला असून, घरकाम करणाऱ्या महिलेलाच या गुन्ह्याप्रकरणी अटक केली आहे. संशयित महिलेकडून पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, ४ जुलै २०२६ रोजी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटच्या मास्टर बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. घरमालकाच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (१) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू केला असता, तपास अधिकाऱ्यांना फ्लॅटचे बाहेरील कुलूप अथवा कपाटाचे कोणतेही नुकसान किंवा तोडफोड झाली नसल्याचे आढळून आले. यामुळे चोरी करणारी व्यक्ती घरातीलच किंवा परिचयातील असण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक निरीक्षक विजय पाटील, उप-निरीक्षक सत्यवान गेंड आणि तपास पथकातील अंमलदारांनी घरातील संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान फिर्यादी यांच्या घरात काम करण्यासाठी अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८ वर्ष, रा. साडेसतरा नळी, हडपसर, पुणे) ही महिला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, तिने पैशांची गरज असल्याने मास्टर बेडरूममधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेकडून पोलिसांनी ७ लाख ३० हजार रुपये किमतीचे एकूण ४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यामध्ये १५.५५० मिली ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी, ०९.५५० मिली ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि १५.८०० मिलीग्रॅम रंगीबेरंगी मणी असलेली सोन्याची चैन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक विजय पाटील आणि हवालदार निलेश किरवे करत आहेत.
ही कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उप-आयुक्त जीवन बेनिवाल, हडपसर विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक निरीक्षक विजय पाटील, उप-निरीक्षक सत्यवान गेंड, अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, बापू लोणकर, भाऊसाहेब कटके, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, विजय कानेकर, धीरज शेलार, महावीर लोंढे आणि शितल खळदकर यांच्या पथकाने केली आहे.
Labels: Pune Crime, Hadapsar Police, Housemaid Theft, Gold Recovery, Pune City Police.
Search Description: Hadapsar Police solved a major theft case by arresting a housemaid who stole gold ornaments worth over Rs 7.30 lakh from a flat in Pune.
Hashtags: #PuneCrime #HadapsarNews #TheftCaseSolved #PunePolice #CrimeBranch Pune
घरकाम करणाऱ्या महिलेनेच चोरले ७ लाख ३० हजारांचे दागिने, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Reviewed by ANN news network
on
७/११/२०२६ ०९:२९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: