पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांच्या विक्री आणि खरेदीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने कात्रज भागात धडक कारवाई केली. ८ जुलै २०२६ रोजी रात्री गस्त घालत असताना पथकाला कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेसमोरील उड्डाणपुलाखाली प्रशांत सुरेश सावंत (वय ३८) याला संशयास्पद स्थितीत ताब्यात घेतले. त्याच्याकडील प्रवासी बॅगेची झडती घेतली असता, त्यात २ किलो ८९५ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) सापडले.
या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५ कोटी ७९ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
Labels: Pune Crime, Anti-Narcotics, Drug Bust, Pune City Police, Crime Branch
Search Description: Pune Crime Branch seized 2.895 kg of Mephedrone worth over Rs 5.79 crore in Katraj, arresting a history-sheeter.
Hashtags: #PuneCrime #DrugBust #AntiNarcotics #PunePolice #CrimeBranch
पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, ५ कोटींहून अधिक किमतीचे मेफेड्रॉन जप्त
Reviewed by ANN news network
on
७/११/२०२६ ०९:२३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: