नामांकित कंपन्यांच्या दुधात पाणी मिसळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट


दहिसर, मुंबई: दहिसर पूर्व भागातील आर.एन. ०८८/३९, रूम नंबर बी-३, दुबे चाळ नंबर २, राजेश कंपाउंड जवळ एकाकडून नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या १२ व्या कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे ९ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यादरम्यान, एक इसम अमुल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या कात्रीने कापून त्यातील काही दूध बाहेर काढून त्यात मानवी आरोग्यास घातक असे अस्वच्छ पाणी मिसळताना आढळून आला. भेसळ केल्यानंतर या पिशव्या स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सील करून, त्या नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केली जात होती.

या कारवाईत पोलिसांनी अमुल आणि गोकुळ कंपन्यांचे एकूण ४७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले, ज्याची किंमत २९,७५० रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त, अमुल ताजा, अमुल गोल्ड आणि अमुल बफेलोच्या ३२७ रिकाम्या बनावट पिशव्या, दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या दुधाची किंमत २९,७५० रुपये तर इतर मालाची किंमत १०,००० रुपये असून एकूण ३९,७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त केलेले भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.

संबंधित इसमाविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भा.न्या.सं. कलम २७४, ३४५(३), ३४७(१), ३१८(४), ३३६(३), ३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या कलम २६, २७, ३१ व ५९ आणि ६३ अन्वये कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कोते करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, आयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक आयुक्त रविंद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदिप येडे-पाटील, निरीक्षक बाळासाहेब राऊत, पूजा खांडेकर, विजय रासकर, सहायक निरीक्षक समीर मुजावर, युवराज चव्हाण,उपनिरीक्षक किरण कोते, अजय सावंत, सहायक फौजदार सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, संतोष राणे, कल्पेश सावंत आणि पथकातील अन्य अंमलदारांनी पार पाडली. यासोबतच अन्न सुरक्षा अधिकारी तुषार शेळके आणि त्यांच्या पथकाचाही यात सहभाग होता.



Labels: Crime News, Mumbai Police, Milk Adulteration, Consumer Safety, Dahisar Crime.

Search Description: Crime Branch Unit 12 busted a milk adulteration racket in Dahisar, Mumbai, seizing 470 liters of adulterated milk and arresting one person.

Hashtags: #MumbaiCrime #MilkAdulteration #DahisarPolice #PublicSafety #CrimeBranchMumbai



नामांकित कंपन्यांच्या दुधात पाणी मिसळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट  नामांकित कंपन्यांच्या दुधात पाणी मिसळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट Reviewed by ANN news network on ७/११/२०२६ ०९:१०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".