रात्रगस्तीदरम्यान पिस्तुल व ६ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात


मुंबई | २७ जुलै २०२६ : काळाचौकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्रगस्तीदरम्यान श्रीकांत रेड्डीज रोड, बीएमसी ई वॉर्ड ऑफिससमोर, रे रोड येथे बेकायदेशीरपणे भारतीय बनावटीचे पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरीफ मोहमद आस्लम शेख (वय ३२, रा. जे.जे. कॉलनी, बांद्रा वेस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी बांद्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात  पाहिजे असलेला आरोपी होता.

काळाचौकी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक २७ जुलै रोजी रात्रगस्तीवर असताना ठाकुर गोडाऊन परिसरात १० व्यक्ती महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला हुक्का पिताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करत असताना संशयित आरीफ मोहमद आस्लम शेख याची अंगझडती घेण्यात आली. त्या वेळी त्याच्या बॅगेत २५,००० रुपये किमतीचे एक भारतीय बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्तुल - बॅरेल लांबी १५ सेमी, मूठ लांबी ८.४ सेमी, ७.६५ एमएम कॅलिबर) आणि १,२०० रुपये किमतीचे ६ जिवंत काडतुसे आढळून आली.

तपासादरम्यान उघड झाले की, आरोपीवर यापूर्वी बांद्रा आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करण्याचे ८ गुन्हे आणि विनयभंगाचा १ गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी दोन वेळा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो सध्या बांद्रा पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. ९१९/२०२६ (बीएनएस कलमांन्वये) गुन्ह्यात फरार होता.

काळाचौकी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच सोबत आढळलेल्या इतर ९ व्यक्तींवर कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त विक्रम देशमाने, उप आयुक्त अनुराग जैन, सहाय्यक आयुक्त भोईवाडा विभाग, वरिष्ठ निरीक्षक आदिनाथ गावडे आणि निरीक्षक (गुन्हे) प्रदिप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मुलाणी, चौधरी, उपनिरीक्षक काकडे, हवालदार चन्ने, शिपाई पवार, कुंभार आणि महिला शिपाई गवारी यांनी केली.


  • Labels: Mumbai Police, Crime News, Kalachowkie, Arrest, Arms Act, Crime Branch

  • Search Description: Kalachowkie Police arrested a wanted criminal Arif Shaikh with an illegal pistol and 6 live cartridges during a night patrol in Mumbai.

  • Hashtags: #MumbaiPolice #CrimeNews #Kalachowkie #PoliceAction #BreakingNews


रात्रगस्तीदरम्यान पिस्तुल व ६ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात रात्रगस्तीदरम्यान पिस्तुल व ६ जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात Reviewed by ANN news network on ७/२८/२०२६ ११:२४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".