बांद्रा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे कुख्यात गुंड झुल्फीकार बेहलीम आणि त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम यांनी हस्तकांमार्फत कंत्राटी काम सुरू करण्यासाठी २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी या टोळीने दिली होती. या माहितीची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने बांद्रा परिसरात सापळा रचून खंडणीची रक्कम स्वीकारताना १२ जणांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी बांद्रा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५५५/२०२६ (गुन्हे शाखा नोंद क्र. ९२/२०२६) अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०८(५), ३५१(३), ६१(२), ३(५) सह शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर तपासाची सूत्रे गुन्हे शाखा कक्ष ९ कडे सोपवण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी झुल्फीकार बेहलीम याच्यावर यापूर्वी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेली असून तो जामिनावर मुक्त होता. या टोळीने मुंबई व परिसरातील अनेक व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अशा प्रकारची खंडणीची मागणी झाली असल्यास नागरिकांनी गुन्हे शाखा कक्ष ९ किंवा मुंबई पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, आयुक्त (प्रकटीकरण-०१) नवनाथ ढवळे आणि सहायक आयुक्त विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक, निरीक्षक महेंद्र पाटील, जयदीप जाधव, मोहन जगदाळे, विजय धोत्रे, श्रीराम घोडके, उपनिरीक्षक कल्याण पाटील, ऋषिकेश बाबर, सुजित म्हैसधुणे, सहायक फौजदार शिंदे, म्हाळसंक, भोसले, वैद्य, गवळी, हवालदार परब, राहुल पवार, भिंगारदेवे, शिपाई पाटील, सोनवणे, कदम, बच्छाव आणि महिला हवालदार गडहिरे यांनी ही कारवाई केली.
Labels: Mumbai Crime Branch, Zulfikar Behlim, Extortion Gang, Bandra Crime, Mumbai Police, Crime News
Search Description: Mumbai Crime Branch arrests notorious gangster Zulfikar Behlim and 11 members of his extortion gang red-handed in Bandra while accepting Rs 25 lakh extortion money.
Hashtags: #MumbaiPolice #CrimeBranch #ExtortionGang #ZulfikarBehlim #BandraNews #CrimeNews #Mumbai
बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड झुल्फीकार बेहलीम १२ साथीदारांसह गजाआड
Reviewed by ANN news network
on
७/२९/२०२६ ११:२९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: