अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा छापा; ३५.५ लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त


मुंबई | २८ जुलै २०२६ : मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कलानगर जंक्शन परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटच्या पथकाने धडक कारवाई करत ३५ लाख ५० हजार रुपये किमतीचा १४२ ग्रॅम 'एमडी' (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटचे पथक मुंबई शहरातील अंमली पदार्थ खरेदी-विक्री, पुरवठा व साठा करणाऱ्यांचा शोध घेत गस्त घालत होते. २७ जुलै २०२६ रोजी रात्री २३:३० ते २८ जुलै २०२६ रोजी ०१:२५ वाजेच्या सुमारास कलानगर जंक्शन, बांद्रा पूर्व येथे एकाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. पोलिसांनी त्याला रोखून झडती घेतली असता त्याच्याकडे ३५,५०,००० रुपये मूल्याचा १४२ ग्रॅम 'एमडी' अंमली पदार्थ मिळून आला.

याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४३०/२०२६ (अंमली पदार्थ विरोधी कक्ष गु.र.क्र. ६८/२०२६) अन्वये एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८(क) सह २२(क) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या उप आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक  आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी युनिटचे प्रभारी  निरीक्षक संतोष साळुंखे, सहायक  निरीक्षक अमित घोगरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.


  • Labels: Anti Narcotics Cell, Worli Unit, MD Drug Seizure, Bandra Crime, Kherwadi Police, Mumbai Police

  • Search Description: Mumbai Police Anti Narcotics Cell Worli Unit seizes MD drugs worth Rs 35.50 lakh at Kalanagar Junction Bandra East and arrests one suspect.

  • Hashtags: #AntiNarcoticsCell #MumbaiPolice #DrugBust #BandraEast #NDPS #CrimeNews #Mumbai

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा छापा; ३५.५ लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा छापा; ३५.५ लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त Reviewed by ANN news network on ७/२९/२०२६ ११:३८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".