मुंबई | २८ जुलै २०२६ : मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर हत्या आणि मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) प्रकरणातील फरार आरोपी सुमित स्वस्तिक सावंत (वय ३२, रा. चुनाभट्टी, मुंबई) याला मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने खारघर, नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी गेल्या तीन वर्षांपासून विविध राज्यांमध्ये आपले अस्तित्व लपवून वावरत होता. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चुनाभट्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर क्रमांक ५४४/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), १२०(ब) (गुन्हेगारी कट), २१२, २०१, ३४ सह शस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) १९९९ चे कलम ३(i)(ii), ३(२), ३(४) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अवैध आग्नेयास्त्र (शस्त्रे) पुरवल्याचा गंभीर आरोप सुमित सावंत याच्यावर आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो अटक टाळण्यासाठी सिंधुदुर्ग, गोवा, चेन्नई, राजस्थान आणि दिल्ली या परिसरात लपून राहत होता.
गुन्हे शाखा कक्ष ६ कडून या प्रकरणाचा समांतर तपास केला जात होता. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती गोळा केली असता, आरोपी सध्या खारघर (नवी मुंबई) परिसरात लपून राहत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तांत्रिक व मानवी कौशल्याचा सुरेख वापर करत गुन्हे शाखेच्या पथकाने गीतांजली ज्वेलर्सजवळ, सेक्टर १९, खारघर येथून त्याला ताब्यात घेतले.
सदर आरोपी सुमित स्वस्तिक सावंत (वय ३२, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. १२८/८४, स्वदेशी मिल चाळ, रिलायन्स फ्रेश समोर, चुनाभट्टी, मुंबई-२२) याला अटक करून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, उप आयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहायक आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी निरीक्षक भरत घोणे, निरीक्षक सुशांत सावंत, सहायक निरीक्षक नवनाथ काळे, श्रीकांत काळे, रूपाली चौधरी, उपनिरीक्षक शरद नाणेकर, संदीप रहाणे, कल्पना माशेरे, सुहास देसाई, हवालदार गायकवाड, खेडकर आणि महिला शिपाई उर्मिला शेवाळे यांच्या पथकाने केली.
Labels: Mumbai Crime Branch, MCOCA Arrest, Sumit Sawant, Chunabhatti Murder Case, Kharghar Arrest, Mumbai Police
Search Description: Mumbai Crime Branch Unit 6 arrests MCOCA absconder Sumit Sawant from Kharghar after 3 years in Chunabhatti murder and illegal firearms case.
Hashtags: #MumbaiPolice #CrimeBranch #MCOCA #Kharghar #Chunabhatti #CrimeNews #BreakingNews
चुनाभट्टी हत्या प्रकरणातील मोक्काचा फरार आरोपी सुमित सावंत ३ वर्षांनंतर जेरबंद
Reviewed by ANN news network
on
७/२९/२०२६ ११:१२:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: