पुण्याचा ऐतिहासिक वारसा देशभरात पोहोचवण्याचा उद्देश; हेरिटेज वॉक, स्केचिंगसह विविध उपक्रम
पुणे, दि. ३० ऑगस्ट (प्रतिनिधी): पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा आणि उत्सव यांचा सुंदर मिलाफ देशभर पोहोचवण्याच्या उद्देशाने सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन आणि ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांनी आयोजित केलेल्या "उत्सव हेरिटेज सिटीज सिरीज २०२५, पुणे एडिशन" या कार्यक्रमाचे आज नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पूजा मिसाळ, संचालक करण मिसाळ, पुणे मेट्रोचे संचालक श्री. माने, ब्रिक संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत शहरातील ऐतिहासिक वास्तूंना व उत्सवांना उजाळा देण्यासाठी हेरिटेज वॉक, स्केचिंग, राष्ट्रीय परिषद आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संस्थेने जनजागृतीसाठी तयार केलेले लघुपटही प्रदर्शित करण्यात आले. शुक्रवार पेठेतील कै. वस्ताद शेखचंद नाईक तालीम मित्र मंडळ येथे या कार्यक्रमाशी संबंधित प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या उपक्रमाला पुणे महानगरपालिका व पुणे मेट्रोचेही सहकार्य लाभले आहे. तसेच, संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक उत्कृष्ट पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
Utsav Heritage
Pune
Madhuri Misal
Heritage Walk
Education Foundation
Cultural Event
#Pune #Heritage #Utsav2025 #MadhuriMisal #PuneCulture #HeritageCity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: