पुणे : सातारा पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात कुख्यात घरफोडी करणाऱ्या लखन भोसलेचा एन्काऊंटर केला आहे. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे सातारा पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला लखन भोसले शिक्रापूरजवळ आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने एका महिलेवर चाकूने हल्ला करून तिचे दागिने चोरले होते, ज्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात लखन भोसले जागीच ठार झाला. त्याचा एक साथीदार मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे.
Pune Crime
Satara Police
Encounter
Lakhan Bhosale
Robbery
#PuneCrime #SataraPolice #Encounter #CrimeNews #LakhanBhosale
Reviewed by ANN news network
on
८/३०/२०२५ ०९:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: