चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

 


महापारेषण कंपनीच्या कामामुळे पाणीपुरवठा होणार खंडित

मोशी, चऱ्होली, डुडुळगावसह अनेक भागांना पाणी मिळणार नाही

शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता - मनपाचे आवाहन

पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रात दुरुस्तीची कामे होणार असल्याने गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ही कामे केली जाणार आहेत.

यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर (सेक्टर ४, ६, ९, ११ आणि १२), शिवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आणि चोवीसावाडी या परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्णपणे बंद राहील.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, २२ ऑगस्ट रोजी सकाळी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.



  • Pimpri-Chinchwad

  • Water Supply Disruption

  • Chikhali Water Treatment Plant

  • PMC

  • Planned Maintenance

 #PCMC #PimpriChinchwad #WaterSupply #WaterCut #Pune #Maharashtra

चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद Reviewed by ANN news network on ८/१९/२०२५ ०५:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".