भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी आणि बी.व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्टमध्ये संशोधन सहकार्य करार
संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकासाला चालना मिळणार
पुणे आणि अहमदाबाद येथील संस्थांमध्ये सामंजस्य करार
डॉ. के. एस. लढ्ढा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा
पुणे, (प्रतिनिधी): पुणे येथील भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी आणि अहमदाबाद येथील श्री बी.व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात संशोधन सहकार्य आणि प्रशिक्षणासाठी १९ ऑगस्ट २०२५ रोजी एक सामंजस्य करार झाला आहे. या कराराचा उद्देश औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील संशोधन सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकास साधणे हा आहे.
या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उच्चस्तरीय विश्लेषणात्मक अभ्यास यांना चालना मिळणार आहे, ज्यामुळे शैक्षणिक उत्कृष्टता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन मिळेल.
या दोन्ही संस्था संयुक्तपणे एक आठवड्याची राज्यस्तरीय 'स्किल डेव्हलपमेंट' कार्यशाळा आयोजित करणार आहेत. मुंबईतील आय.सी.टी. विद्यापीठाचे डॉ. के. एस. लढ्ढा या कार्यशाळेत प्रमुख वक्ते आणि प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमावेळी पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, बी. व्ही. पटेल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनीष निवसरकर, उपसंचालक डॉ. नीता श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. सत्यनारायणन आणि कार्यशाळा संयोजक डॉ. वैभव शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Bharati Vidyapeeth
Pharmacy College
MoU
Research Collaboration
Skill Development
#BharatiVidyapeeth #PharmacyCollege #MoU #Research #SkillDevelopment #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: