एकाच विकासकामाचे बिल अनेकदा काढल्याचा आरोप; ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची मागणी
भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून व्याजासह रक्कम वसूल करा - काळुराम पवार
हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे; माहिती अधिकारात गैरव्यवहार उघड झाल्याचा दावा
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी केला आहे. पुढील दोन आठवड्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि हडपलेली रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी त्यांनी आज पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना पवार यांनी आरोप केला की, संबंधित अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदार कंपन्यांनी एकाच कामाची अनेकदा बिले काढून, अर्धवट काम करून किंवा ज्यादा मापे नोंदवून महापालिकेची फसवणूक केली आहे. देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीचे उदाहरण देत ते म्हणाले की, एकाच कामाची वेगवेगळ्या नावांनी दोनदा बिले काढून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला गेला आहे.
हा भ्रष्टाचार म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याचे सांगत काळुराम पवार यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र विष्णू शिंदे यांच्यावर टाळाटाळ केल्याचा आरोपही केला. तसेच, या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली.
Pimpri-Chinchwad
Kaluram Pawar
Corruption Allegation
PCMC
Press Conference
#PCMC #PimpriChinchwad #Corruption #KaluramPawar #PressConference #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: