एमकेसीएलचा रौप्य महोत्सवी स्थापना दिन उत्साहात साजरा
पुस्तकांचे प्रकाशन, ॲप्सचे अनावरण आणि प्रेरणादायी भाषणांचा समावेश
डॉ. अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
पुणे, (प्रतिनिधी): महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा (एमकेसीएल) रौप्य महोत्सवी स्थापना दिन समारंभ २० ऑगस्ट रोजी पुण्यातील बंटारा भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मराठी साहित्य सृष्टी पोर्टल’चे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यातील डिजिटल दरी कमी करण्याचे काम एमकेसीएलने केले आहे. माहिती-तंत्रज्ञान क्रांतीचे लोकशाहीकरण करण्यात संस्थेला यश मिळाले." या यशामागे डॉ. विवेक सावंत आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांचे प्रयत्न कारणीभूत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात चार सत्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'एमकेसीएल: संस्था आणि संस्थापक', 'इंडियन आर्ट इन द डिजिटल वर्ल्ड', 'एज्युकेशन टुमारो' आणि 'प्रांजळाचे आरसे' या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच 'सायबर रक्षक', 'युनिफाइड क्रेडिट इंटरफेस' आणि 'आयटीत मराठी-ऐटीत मराठी' यांसारख्या ॲप्सचे अनावरणही करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमकेसीएलच्या वाटचालीस शुभेच्छा देत ही वाटचाल आणखी यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
MKCL
Silver Jubilee
Devendra Fadnavis
Digital India
Pune
#MKCL #SilverJubilee #DevendraFadnavis #Pune #Maharashtra #DigitalIndia

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: