दौंड, (प्रतिनिधी): दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून एका महिला अधिकारी आणि एका खासगी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.
भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकर वैशाली धस्कटे यांनी तक्रारदारांच्या जागेचे 'क' पत्रक आणि त्याचा तक्ता तयार करून देण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना वैशाली धस्कटे यांनी नेमलेल्या खासगी कर्मचारी फय्याज शेख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
या कार्यालयात काम करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा होती. या कारवाईमुळे या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. दोषींवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Daund
ACB Trap
Land Records Office
Corruption
Bribery
#Daund #ACB #Corruption #Bribery #Maharashtra #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: