वाघोलीतून चोरीस गेलेले तब्बल ५ लॅपटॉप जप्त
पुणे: लोणी काळभोर पोलिसांनी एका लॅपटॉप चोराला मोठ्या शिताफीने पकडून त्याच्याकडून सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांचे ५ लॅपटॉप जप्त केले आहेत. हा आरोपी वाघोली येथून चोरीच्या गुन्ह्यात सामील होता.
१३ ऑगस्ट
२०२५ रोजी लोणी
काळभोर पोलीस स्टेशनचे तपास
पथक हद्दीत गस्त
घालत असताना, पोलीस
अंमलदार शिरगिरे आणि कुदळे यांना
एका गुप्त बातमीदाराकडून माहिती
मिळाली की, पुणे-सोलापूर रोडवरील चिंतामणी पार्कजवळ एका व्यक्तीच्या पाठीवर
काळ्या रंगाची जड
बॅग आहे आणि
तो संशयास्पदरीत्या फिरत
आहे. या माहितीच्या आधारे,
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा
बाबर यांनी पथकासह
तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच
संशयित व्यक्ती पळून
जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला
असता, तो ठेच
लागून खाली पडला.
पोलिसांनी त्याला
ताब्यात घेऊन चौकशी केली
असता त्याने त्याचे
नाव सागर नागराज
(वय ३१, रा.
तामिळनाडू) असल्याचे सांगितले. त्याच्या बॅगेची
तपासणी केली असता
त्यात एकूण ५
लॅपटॉप आढळले. अधिक
चौकशीत त्याने हे
लॅपटॉप १२ ऑगस्ट
रोजी पहाटे वाघोली,
ता. हवेली येथून
चोरल्याची कबुली दिली.
या संदर्भात वाघोली
पोलीस स्टेशनमध्ये या
चोरीचा गुन्हा नोंद
असल्याची माहिती लोणी काळभोर
पोलिसांना मिळाली. लोणी काळभोर
पोलिसांनी आरोपीला अटक करून, जप्त
केलेला मुद्देमाल पुढील
कारवाईसाठी वाघोली पोलिसांच्या ताब्यात दिला
आहे. ही कारवाई
पोलीस उपायुक्त डॉ.
राजकुमार शिंदे
आणि सहायक पोलीस
आयुक्त अनुराधा उदमले
यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली.
Crime, Loni Kalbhor Police Station, Pune, Laptop Theft,
Arrest, Wagholi
#Pune #Crime #LaptopTheft #LoniKalbhor #Wagholi #Police #Arrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: