१९९ रुपयांवरील अनलिमिटेड प्रीपेड व्हॉइस पॅक्सवर दर रिचार्जमागे २ दिवसांची वाढीव वैधता
फक्त कॉल सुविधा वापरणाऱ्या किंवा खूप कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना एकाच महिन्यात पुन्हा रिचार्ज करावे लागण्याचे आव्हान दीर्घकाळापासून भेडसावत होते. सध्याच्या २८ दिवसांच्या पॅकमुळे ग्राहकांना एकाच कॅलेंडर महिन्यात दोनदा रिचार्ज करावे लागते किंवा काही वेळा सेवा खंडित झाल्यामुळे गैरसोय सहन करावी लागते. 'वी गॅरंटी' प्रोग्रामचा उद्देश ही समस्या दूर करणे हा आहे.
'वी गॅरंटी'मुळे आता ग्राहकांना २८ दिवसांच्या ऐवजी ३० दिवसांची सेवा वैधता मिळेल, ज्यामुळे त्यांना एका महिन्यात एकदाच रिचार्ज करावे लागेल. २८ दिवसांपेक्षा जास्त वैधतेच्या रिचार्जमध्ये देखील हे अतिरिक्त २ दिवस रिचार्ज सायकलमधील अंतर भरून काढण्यात मदत करतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक सुविधा आणि अखंडित सेवा अनुभवता येते.
हा 'वी गॅरंटी' लाभ २जी हँडसेट वापरणाऱ्या आणि १९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे अनलिमिटेड व्हॉइस रिचार्ज पॅक वापरणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी लागू आहे. उदाहरणार्थ, १९९ रुपयांच्या पॅकवर अनलिमिटेड कॉल, २जीबी डेटा (असम, ईशान्य भारत, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानसाठी ३जीबी) आणि ३०० एसएमएससह २८ दिवसांची वैधता मिळते, यावर २ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. तसेच २०९ रुपयांच्या पॅकवर कॉलर ट्यूनसह २ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल.
दरम्यान, 'वी गॅरंटी' प्रोग्राम ४जी आणि ५जी ग्राहकांसाठी गेल्या वर्षीच सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत संपूर्ण वर्षभरात १३०जीबी गॅरंटीड अतिरिक्त डेटा दिला जातो, जो १३ सलग सायकलमध्ये दर २८ दिवसांनी १०जीबी आपोआप क्रेडिट केला जातो. या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांकडे २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे दैनंदिन डेटा अनलिमिटेड प्लॅन्स असणे आवश्यक आहे.
२जी ग्राहकांना 'वी गॅरंटी' अतिरिक्त वैधता लाभ मिळवण्यासाठी युएसएसडी *९९९# डायल करता येईल किंवा १२१२ या क्रमांकावर फोन करता येईल. ४जी/५जी ग्राहकांसाठी अतिरिक्त डेटा ऑफर 'वी ॲप'वरून देखील मिळवता येईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: