सुरेश गायकवाड यांचा 'आप'मध्ये प्रवेश; पिंपळे निलखमध्ये पक्षाला बळ

 


पिंपरी-चिंचवड, दि. ४ जुलै २०२५: सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले, पिंपळे निलखमधील जनतेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले आणि ओबीसी समाजासाठी सातत्याने झटणारे  सुरेश गायकवाड यांनी आज अधिकृतपणे आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अरुणा  गायकवाड या २००२ ते २००७ या काळात नरसेविका म्हणून कार्यरत होत्या.

त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळे निलख परिसरात आम आदमी पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार आहे, तसेच सामाजिक समरसतेच्या कार्यात नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आणि स्थानिक विकासासाठी लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपळे निलख परिसरात अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्प राबवले गेले आहेत.

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अजित आपके पाटील  यांच्या हस्ते व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष  रविराज  काळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Local News, Politics, Political Party, Pimpri-Chinchwad, Social Work 

 #AamAadmiParty #AAP #SureshGaikwad #PimpriChinchwad #PoliticalEntry #SocialWorker #OBCCommunity

सुरेश गायकवाड यांचा 'आप'मध्ये प्रवेश; पिंपळे निलखमध्ये पक्षाला बळ  सुरेश गायकवाड यांचा 'आप'मध्ये प्रवेश; पिंपळे निलखमध्ये पक्षाला बळ Reviewed by ANN news network on ७/०४/२०२५ ०९:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".