चिंचवड, ५ जुलै २०२५: आषाढी एकादशीच्या निमित्ताने चिंचवडमधील गीतामंदिर विद्यालयात आज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी आणि त्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते, तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीमध्ये भाग घेतला. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषात शाळा व परिसर विठ्ठलमय झाला होता.
या पालखी सोहळ्यात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखीचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका वाढळ यांनी केले होते.
या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि वारी परंपरेविषयी प्रेम आणि आदर निर्माण करण्यास मदत झाली.
Palkhi Sohala, Geetamandir Vidyalaya, Chinchwad, Ashadhi Ekadashi, Cultural Event, Student Participation, Vitthal Rukmini, Pimpri Chinchwad
#PalkhiSohala #Chinchwad #GeetamandirVidyalaya #AshadhiEkadashi #Warkari #PimpriChinchwad #CulturalEvent #Education

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: