मुंबई, ०४ जुलै २०२५: मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर धारावी परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्पुरते आदेश जारी केले आहेत. ताजीया मिरवणुकांदरम्यान जनतेला होणारा धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
प्रदीप चव्हाण, पोलीस उप आयुक्त, पूर्व उपनगरे, वाहतूक (अतिरिक्त कार्यभार मुख्यालय व मध्य विभाग, वाहतूक), मुंबई यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत हे आदेश काढले आहेत.
मुख्य वाहतूक बदल (९० फिट रोड):
नो एन्ट्री मार्ग: अशोक मिल नाका ते कुंभारवाडा जंक्शनपर्यंतचा के.के. कृष्णन मेनन मार्ग (९० फिट रोड) सर्व वाहनांसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग:
अशोक मिल नाकाकडून कुंभारवाडा जंक्शनकडे जाणारी वाहतूक: अशोक मिल नाका येथून के.के. कृष्णन मेनन (९० फिट रोड) मार्गे कुंभारवाडा जंक्शनकडे जाणारी वाहतूक संत रोहिदास मार्ग – पैलवान नरेश माने जंक्शन – सायन रेल्वे स्थानक – सायन रोड नं. ३ – वेद फाटा गोयल जंक्शन (सायन जंक्शन) – डॉ. बी.ए. रोड सायन सर्कल – सायन रुग्णालय जंक्शन – सुलोचना शेट्टी रोडमार्गे पुढे कुंभारवाडा जंक्शनकडे त्यांच्या इच्छित स्थळी जाईल.
कुंभारवाडा जंक्शनकडून अशोक मिल नाक्याकडे जाणारी वाहतूक: कुंभारवाडा जंक्शन येथून के.के. कृष्णन मेनन (९० फिट रोड) मार्गे अशोक मिल नाक्याकडे जाणारी वाहतूक सुलोचना शेट्टी रोडमार्गे सायन रुग्णालय जंक्शन येथे डावीकडे वळून डॉ. बी.ए. रोड सायन सर्कल – वेद फाटा गोयल जंक्शन (सायन जंक्शन) – सायन रोड नं. ३ पैलवान नरेश माने जंक्शनमार्गे संत रोहिदास रोडने इच्छित स्थळी जाईल.
मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी:
के.के. कृष्णन मेनन मार्ग (९० फिट रोड) वरील अशोक मिल नाका ते कुंभारवाडा जंक्शनपर्यंतच्या दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग: ही वाहने के.के. कृष्णन मेनन मार्गे (९० फिट रोड) येणारी वाहतूक कुंभारवाडा जंक्शन येथे डावीकडे वळून टी.एच. कटारीया मार्ग शोभा हॉटेलमार्गे वांद्रे व दादरकडे इच्छित स्थळी जातील.
हे आदेश मोहरम मिरवणुका संपेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Traffic Police, Moharram, Traffic Diversion, Dharavi, Mumbai, Festival, Road Closure
#MumbaiTraffic #Moharram #TrafficAlert #Dharavi #Mumbai #TrafficDiversion #RoadClosure

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: