पुणे, ०५ जुलै २०२५: वाघोली पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील एका अट्टल आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वाघोली परिसरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०६/०४/२०२५ रोजी मौजे केसनंद, थेऊर रोड, पाटील वस्ती, ता. हवेली, जि. पुणे येथे फिर्यादींच्या 'गणेश किराणा स्टोअर' नावाच्या दुकानात दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर आले होते. त्यापैकी एक जण हॉटेलमधील काऊंटरजवळ आला आणि बिस्किट, चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने फिर्यादींच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेला होता. याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गु.रजि.नं. ११५/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, संतोष शेरखाने, मारुती वाघमारे, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे आणि पोलीस अंमलदार विशाल गायकवाड यांच्या तांत्रिक विश्लेषणामुळे गुन्ह्यातील आरोपीचा माग काढण्यात आला.
या पथकाने आरोपी मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ वर्षे, रा. मु. लिंबोडी, पोस्ट. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) याला अटक केली. आरोपीकडून चोरी केलेले सोन्याचे मिनी गंठण (किंमत १,००,०००/- रु.) जप्त करण्यात आले आहे.
Crime, Chain Snatching, Wagholi, Pune Police, Arrest, Gold Seizure, Maharashtra
#WagholiPolice #PunePolice #ChainSnatching #CrimeNews #Arrest #Maharashtra #GoldSeizure

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: