पुणे - पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने सराईत गुन्हेगार चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २७) याला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ६ जीवंत काडतुसे असा एकूण ७६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी आणि अंमलदार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना, अंमलदार तेलंगे पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे हा मुंबई-बंगळूरु हायवे जवळील वडगाव, पुणे येथे पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सापळा रचला. चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे घटनास्थळी येताच त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ ७५,००० रुपये किमतीची ३ गावठी बनावटीची पिस्तूल, १,२०० रुपये किमतीची ६ जीवंत काडतुसे आणि १०० रुपये किमतीची एक ढोलक बॅग असा एकूण ७६,३०० रुपयांचा मुद्देमाल अनाधिकाराने आणि बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगताना आढळून आला.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३३८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३७(१)(२)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख,उप-आयुक्त विवेक मासाळ आणि सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Illegal Firearms, Pistol Seizure, Anti-Narcotic Cell, Pune City, Arrest, Habitual Criminal
#PunePolice #FirearmsSeizure #CrimeNews #Arrested #AntiNarcoticCell

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: