परिचारिकांच्या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

 


नवीन भरती प्रक्रियेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ; 'महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन'च्या आंदोलनानंतर चर्चा

मुंबई, ९ जुलै २०२५: वैद्यकीय शिक्षण विभागातील सेवाशर्ती, भरती प्रक्रिया आणि कामकाजाच्या अडचणींबाबत ठोस उपाययोजनांवर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहे. 'महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन'तर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर मिसाळ यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली.   

परिचारिकांच्या प्रमुख मागण्या: शिष्टमंडळाने राज्यमंत्री मिसाळ यांना त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरणे, वेतनश्रेणी, पदोन्नती व सेवाशर्ती सुधारणे, इन्क्रिमेंट व विविध भत्त्यांचा पुनर्विचार करणे, सेवेत असलेल्या परिचारिकांचे स्थायिकरण व कार्यकालीन धोरणात स्पष्टता आणणे, तसेच केंद्राच्या गाईडलाइननुसार परिचारिकांचे कामकाज, भरती व प्रशिक्षण सुधारणे आदी मागण्यांचा समावेश होता.

नवीन भरती प्रक्रियेला मुदतवाढ: या चर्चेदरम्यान राज्यमंत्री मिसाळ यांनी भरती प्रक्रियेबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या. वेबसाईटवर पेमेंट लोड न होणे, कागदपत्रे अपूर्ण असणे आणि काही विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षांचे निकाल अद्याप न लागणे अशा तांत्रिक कारणांमुळे ही समस्या उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर, अर्ज भरण्याची मुदत वाढवून १४ जुलै २०२५ पर्यंत करण्यात आल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


परिचारिकांच्या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन परिचारिकांच्या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन Reviewed by ANN news network on ७/१०/२०२५ ०५:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".