सिंधुदुर्ग, ०५ जुलै २०२५: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहराजवळ काविलकाटे-रायवाडी येथील एका घरात कुडाळ पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ५२ हजार रुपये किमतीचा १.६८० किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विशाल सुरेश वाडेकर याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याकरिता सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी एक स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केले होते. याच पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
Crime, Narcotics, Drug Bust, Sindhudurg, Kudal, Police, Arrest
#Sindhudurg #KudalPolice #GanjaSeized #DrugBust #CrimeNews #MaharashtraPolice #AntiNarcotics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: