या कारवाईची सुरुवात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका रिक्षा चोरीच्या गुन्ह्यापासून झाली. दिनांक ३० जून २०२५ ते ०१ जुलै २०२५ च्या दरम्यान लक्ष्मी नगर, कोंढवा बुद्रुक येथील शालिनी सुपर मार्केट समोरून ४०,०००/- रुपये किमतीची बजाज कंपनीची रिक्षा (क्र. एम.एच.१२ एन.डब्ल्यु.४४६८) चोरीला गेली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३३१/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना, कोंढवा तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि त्यांच्या पथकातील अंमलदार लक्ष्मण होळकर, विकास कुंभार, सुहास बिडगर, अमोल गोरे, राहुल घुले, ज्योतीबा फुलमाळी, संतोष कोळी, अजित जडम, सूरज घुले, लक्ष्मण मोरे यांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल तपास केला. या माहितीनुसार, वाहन चोरटे सय्यदनगर चौकातील कात्रज बायपास रोडवर थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून प्रल्हाद मुंजाजी ईखे (वय २३, रा. लक्ष्मण कामठे यांच्याकडे भाड्याने, श्रीनाथ डेअरी जवळ, भैरवनाथ मंदिर शेजारील गल्लीमध्ये, कोंढवा बु., पुणे) आणि गजानन उर्फ राज दत्ता खटपटे (वय २४, रा. सदर) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांच्या ताब्यातून १ रिक्षा व एकुण ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २,३५,०००/- रुपये इतकी आहे. आरोपींच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये ०५, लष्कर पोलीस स्टेशनमध्ये ०१, खराडी पोलीस स्टेशनमध्ये ०१ व भोर पोलीस स्टेशनमध्ये ०१ असे एकूण ०८ गुन्हे दाखल होते, जे आता उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई अपर आयुक्त, मनोज पाटील, उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Vehicle Theft, Kondhwa Police, Pune City, Arrests, Stolen Vehicles Recovered, Crime Solved
#PunePolice #VehicleTheft #KondhwaPolice #CrimeNews #StolenVehicles

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: