रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रामचंद्र शंकर घाटे (वय 80) यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले.
घाटे यांचे मूळ गाव पंढरपूर होते. नोकरीनिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले. पुणे महानगरपालिकेत ते नोकरीला होते. शिवजयंती, नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात सामाजिक कामाला सुरुवात केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून प्रवास करताना लातूर जिल्ह्यात भारतमाता मंदिर प्रकल्पावर सपत्नीक पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. काव्यसंग्रह करण्याची त्यांची हातोटी होती. देव, देश, धर्मासाठी समर्पित काम त्यांनी केले. अनेक आंदोलनांना मार्मिक वाक्यरचनेतून व्यापक स्वरूप दिले.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संघाचे जेष्ठ कार्यकर्ते स्व. धनंजय घाटे यांचे ते वडील होते.
आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: