पुणे, १७ जुलै २०२५: पुणे महानगरपालिकेकडून शहरात दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. बोपोडी येथील वि. भा. पाटील पुलाच्या दुरुस्ती कामासाठी वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
बोपोडी पूल १२ दिवसांसाठी वाहतुकीस बंद
बोपोडी
येथील वि. भा.
पाटील पुलाच्या दुरुस्तीसाठी राजर्षी शाहू
महाराज चौकातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) दिशेने जाणारी
पुलावरील वाहतूक १२ दिवसांसाठी, म्हणजेच
दिनांक १६ जुलै २०२५ ते २७ जुलै २०२५ पर्यंत, पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, पी.सी.एम.सी. कडून राजर्षी शाहू महाराज चौकाकडे जाणारी एकेरी पुलावरील वाहतूक सुरु राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी राजर्षी शाहू महाराज चौकातून (बोपोडी) पी.सी.एम.सी. कडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले असून, यामुळे होणाऱ्या तसदीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
Pune Municipal Corporation, PMC, Bopodi Bridge, Traffic
Diversion, Road Repair, Road Adoption Scheme, Citizen Participation, Pune News
#Pune #PMC #TrafficAlert #BopodiBridge #RoadAdoptionScheme #PuneNews #CitizenParticipation #SmartCity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: