पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकांकडून दोन मोठ्या कारवाया; लाखोंचा अफू आणि एम.डी. जप्त, दोन आरोपी ताब्यात

 


पुणे, ०६ जुलै २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांनी शहरात दोन मोठ्या कारवाया करत सुमारे २६ लाखांहून अधिक किमतीचे अफू आणि मेफेड्रॉन (एम.डी.) हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

कोंढव्यात १४.९८ लाखांचा अफू जप्त:

०५ जुलै २०२५ रोजी, अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या पोलिसांनी कोंढवा परिसरातून भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७४९ ग्रॅम अफू, ज्याची किंमत १४ लाख ९८ हजार रुपये आहे, तो जप्त करण्यात आला. याव्यतिरिक्त, ५००० रुपयांचा मोबाईल फोन, २०० रुपयांची हँडबॅग आणि १००० रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण १५ लाख ०४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बिबवेवाडीत ११.२४ लाखांचे एम.डी. जप्त:

त्याच दिवशी, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने बिबवेवाडी येथून विठ्ठल उर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ५५.१०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत ११ लाख ०२ हजार रुपये आहे. तसेच, २००० रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि २०,००० रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 ही कारवाई  निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्यासह  अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, सचिन माळवे आणि आझीम शेख यांनी केली.

पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकांकडून दोन मोठ्या कारवाया; लाखोंचा अफू आणि एम.डी. जप्त, दोन आरोपी ताब्यात पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकांकडून दोन मोठ्या कारवाया; लाखोंचा अफू आणि एम.डी. जप्त, दोन आरोपी ताब्यात Reviewed by ANN news network on ७/०६/२०२५ ११:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".