उरण तालुक्यातील गोवठणे गावचे सुपुत्र असलेले समाधान म्हात्रे हे सुरुवातीपासूनच पक्षाचे कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. याआधी ते महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस कै. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात समाधान म्हात्रे हे नेहमी सहभागी होत असून, पक्षाची ध्येयधोरणे, कार्य आणि विचार तळागाळात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे केले आहे. ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. समाधान म्हात्रे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल समाधान म्हात्रे यांनी सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: