एसआयएफ आणि आंतरराष्ट्रीय संपत्ती व्यवस्थापनावर निःशुल्क प्रशिक्षण
मुंबई, ७ जुलै २०२५: भारतातील म्युच्युअल फंड वितरकांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, द वेल्थ कंपनीने तीन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यातील दोन कार्यक्रम मूडीज आणि पीजीपी अकादमीसोबत राबवले जाणार असून, तिसरा द वेल्थ कंपनीने स्वतः विकसित केला आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असून, उद्योगातील हे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे प्रायोजित आहेत. १५ जुलै २०२५ पासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमांचे उद्दिष्ट 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर ५,००० वितरकांना भविष्यातील संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूकदार वर्तन आणि नवीन काळातील गुंतवणूक उत्पादनांच्या दृष्टीने तयार करणे आहे.
तीन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे वितरकांना विकसित होत असलेल्या उद्योग क्षेत्रात सखोल ज्ञान, आत्मविश्वास आणि आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्यास मदत मिळेल:
१. पीजीपी अकादमी: स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडसाठी (एसआयएफ) ट्रेनिंग:
यामध्ये एनआयएसएमच्या तेराव्या सिरीज आणि कॉमन डेरिव्हेटिव्ह्ज सर्टिफिकेशन एक्झामिनेशनशी संलग्न ऑनलाइन १५ (१५ आठवडे) एसआयएफ प्रशिक्षण सत्रांचा (रेकॉर्डिंगसह) लाभ मिळेल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, सहभागींना पीजीपी अकादमी आणि द वेल्थ कंपनीकडून संयुक्त प्रमाणपत्र अगदी निःशुल्क मिळेल.
२. मूडीज आणि पीजीपी: आंतरराष्ट्रीय संपत्ती व्यवस्थापनातील (एआयडब्ल्यूएम) अभ्यासक्रम:
जागतिक पातळीवर ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने यात प्रस्थापित आणि उदयोन्मुख व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी एकूण २० प्रशिक्षण सत्रे (२० आठवडे) लाइव्ह घेतली जातील. हा कार्यक्रम सहभागींना संपत्ती व्यवस्थापनातील क्लिष्ट आव्हानांना तोंड देण्यासाठी कौशल्याने सज्ज करतो.
३. द सायकॉलॉजी ऑफ वेल्थ कॉन्व्हर्सेशन्स (बोनस सत्र):
द वेल्थ कंपनीने विकसित केलेल्या या सत्रात वितरकांच्या दैनंदिन अनुभवावर आधारित ग्राहकांशी जोडलेले राहण्यासाठी एक पद्धतशीर मार्ग सांगितला जाईल. हे सत्र आर्थिक निर्णय घेताना अतार्किक निर्णय कसे घेतले जातात आणि वितरक गुंतवणूकदारांच्या आर्थिक सवयींना कसे आकार देतात, विश्वास कसा वाढवतात, हे सांगेल.
'वितरक-प्रथम दृष्टिकोन'
द वेल्थ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक सुश्री मधू लुनावत म्हणाल्या, "वितरक हे भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाचा कणा आहेत. हा उपक्रम म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी आमची गुंतवणूक आहे. भविष्यातील गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी आवश्यक साधने, आत्मविश्वास तसेच माहिती देण्यासाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम तयार केलेले आहेत." द वेल्थ कंपनीचे मुख्य धोरण अधिकारी श्री. देबाशिष मोहंती यांनीही यावर भर देत म्हटले, "एमएफडीजनी आज शिकण्यात गुंतवलेला प्रत्येक तास आयुष्यभराच्या क्लायंट विश्वासात बदलतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. हे अभ्यासक्रम 'वितरक-प्रथम' दृष्टिकोनावर असलेला आमचा विश्वास प्रतिबिंबित करतात."
या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून द वेल्थ कंपनी एक माहितीपूर्ण, भविष्यासाठी तयार वितरक परिसंस्था विकसित करण्याचे आपले वचन पूर्ण करते. शिक्षणात गुंतवणूक करून आणि जागतिक दर्जाची प्रमाणपत्रे विनामूल्य देऊन, द वेल्थ कंपनी केवळ प्रशिक्षणच देत नाही, तर सर्वात महत्त्वाच्या भागीदारांचे - वितरकांचे - तिच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, हे देखील सिद्ध करते. हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर गुंतवणूक वाढावी यासाठी भारताच्या वितरक नेटवर्कला सक्षम, प्रगत आणि सुसज्ज करण्याची एक चळवळ आहे.
The Wealth Company, Moody's, PGP Academy, Wealth Management Training, SIF Training, Mutual Fund Distributors, Financial Education, India, Investment
#WealthManagement #MutualFunds #FinancialTraining #TheWealthCompany #Moody's #PGPAcademy #IndiaInvests #FinancialLiteracy #DistributorEmpowerment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: