बँक ऑफ बडोदाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा थेरगाव येथे गुणगौरव सोहळा

 


शहर स्वच्छतेत सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – रजनीकांत चौधरी

बँक ऑफ बडोदाच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील सफाई कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

पिंपरी, पुणे (दि. ७ जुलै २०२५): पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर म्हणून ओळखले जाते. यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाबरोबरच सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सफाई कर्मचाऱ्यांबाबत विशेष आदर आहे, तसेच त्यांचा गुणगौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे बँक ऑफ बडोदाचे विभागीय विकास व्यवस्थापक रजनीकांत चौधरी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनमधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सफाई कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन शनिवारी (दि. ५) थेरगाव येथील स्वर्गीय शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी रजनीकांत चौधरी बोलत होते.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, बँक ऑफ बडोदा पीसीएमसीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अभिषेक परमार, विशेष अधिकारी अशोक धुळेकर, महासंघाचे पदाधिकारी अनिल लखन, सनी कदम, मंगेश कलापुरे, सफाई कर्मचारी अध्यक्ष संजय वाघमारे तसेच बहुसंख्य सफाई कर्मचारी व बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी उपस्थित होते.

स्वागत आणि प्रास्ताविक करताना बँक ऑफ बडोदा, पीसीएमसीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अभिषेक परमार यांनी सांगितले की, बँक ऑफ बडोदा सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी बचत, गुंतवणूक, विमा तसेच गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध प्रकारच्या अनेक सुविधा देत असते. याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकवाड यांनी केले, तर सुहास आल्हाट यांनी आभार मानले.

Pimpri Chinchwad, Sanitation Workers, Bank of Baroda, Felicitation, CSR Activity, Cleanliness, Employee Recognition, Rajinikant Chaudhary, Abhishek Parmar

#PimpriChinchwad #SanitationWorkers #BankOfBaroda #SwachhBharat #Cleanliness #CSR #Pune #EmployeeAppreciation #CommunityEvent

बँक ऑफ बडोदाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा थेरगाव येथे गुणगौरव सोहळा  बँक ऑफ बडोदाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा थेरगाव येथे गुणगौरव सोहळा Reviewed by ANN news network on ७/०७/२०२५ ०९:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".