पुणे, ०६ जुलै २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यातील मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला कोंढवा परिसरातून अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट-५, पुणे शहर पथकाकडील पोलीस स्टाफ आणि पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली दि. ०५/०७/२०२५ रोजी भिमनगर, कोंढवा भागात पेट्रोलींग करत असताना, सपोफौ राजस शेख आणि पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ७७/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ च्या कलम १०९, ३५१(२), ३५२, क्रि. लॉ. अ. कलम ७, भा.ह. कायदा कलम ४ (२५), म.पो.अ. क ३७(१) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ चे कलम ३(९), ३(८), ३(८) या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे हेमंत नितीन वाघमारे (वय २४ वर्षे, रा. भिमनगर वसाहत, कोंढवा खुर्द, पुणे) हा परिसरात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हेमंत वाघमारेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा आपले साथीदारासोबत केला असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी निरीक्षक संजय पतंगे, सफौ राजस शेख,अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, शहाजी काळे,पल्लवी मोरे यांनी केली.
MCOCA, Fugitive Arrest, Pune Police, Crime Branch, Kondhwa
#MCOCA #PunePolice #FugitiveArrest #CrimeNews #Kondhwa #PoliceAction #OrganizedCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: