पिंपरी चिंचवड, ९ जुलै (प्रतिनिधी): कामगारांना वेठबिगार व गुलाम बनवणाऱ्या चार नवीन कामगार संहिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या 'जनसुरक्षा विधेयका'च्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज, ९ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला.
या आंदोलनामागची प्रमुख मागणी म्हणजे जनसुरक्षा विधेयक रद्द करणे ही आहे. समितीने आरोप केला आहे की, हे विधेयक 'जनसुरक्षा' या गोंडस नावाखाली देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा आणि सरकारच्या भ्रष्टाचाराला सुरक्षा देण्याचा संविधानविरोधी प्रयत्न आहे.
या कामगार संहितेमुळे कामगारांचे हक्क हिरावून घेतले जात असून, त्यांना एकप्रकारे गुलामीकडे ढकलले जात आहे, असा दावाही समितीने केला आहे. या देशव्यापी संपात पिंपरी चिंचवडमधील कामगार संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवत तीव्र निषेध व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: