पिंपरी, दि. १ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे जून २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ५१, तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण ६१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सत्कार करण्यात आला. सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले की, महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोपवलेली कर्तव्ये जबाबदारीने व प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. तसेच, सहकाऱ्यांशी सौजन्यपूर्ण संबंध जपत, कामकाजावर निष्ठा व सेवेप्रती समर्पण दाखवले आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी यापुढेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी आणि आनंदी जीवन जगावे, तसेच आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा, अशा शुभेच्छा लोणकर यांनी दिल्या.
या कार्यक्रमाला उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माचरे, महादेव बोत्रे, नथा माथेरे, मंगेश कलापुरे यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जून २०२५ अखेर सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये सहशहर अभियंता नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, सहाय्यक आयुक्त नाना मोरे, मुख्याध्यापिका वैशाली तवटे, हमीदा मोमीन, संभाजी बामणे, असिस्टंट मेट्रन किरण गायकवाड, कार्यालय अधीक्षक प्रमोद सावरकर, आनंदा सातपुते, ढवळू मुंढे, लेखापाल राजश्री नेवासकर, मुख्य लिपिक विजय जाधव, प्रमोद निकम, सिस्टर इन्चार्ज मिनहाज सय्यद, विजया रोडे, नंदा गायकवाड यांसारख्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय उपशिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, फिटर, वायरमन, वायरलेस ऑपरेटर, वॉर्ड बॉय, रखवालदार, शिपाई, मजूर, मुकादम, नाईक, तसेच अनेक सफाई कामगार व कचरा कुली यांसारख्या विविध पदांवरील कर्मचाऱ्यांनी सेवा निवृत्ती स्वीकारली. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांमध्ये सफाई सेवक उत्तम त्रिभुवन, माया वाल्मिकी, संदिप लांडगे, शिरीष गायकवाड, तसेच कचरा कुली कैलास जगताप, अंबादास जाधव यांसह इतर काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
Pimpri-Chinchwad, Municipal Corporation, Retirement, Public Service, Felicitation, Employees, Pune
#PCMC #PimpriChinchwad #Retirement #MunicipalEmployees #Felicitation #PublicService #ManojLonkar #PuneNews #EmployeeAppreciation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: