पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात प्रथमच! आमदार अमित गोरखे विधान परिषदेत तालिका सभापतीपदी (VIDEO)

 


पिंपरी-चिंचवड, १ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू, तरुण आणि लोकसंग्राही आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत प्रथमच तालिका सभापती म्हणून आसन ग्रहण केले. पिंपरी-चिंचवड शहरातून विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी बसणारे ते पहिले युवा आमदार ठरले आहेत, ही शहरासाठी एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व, पण ठाम विचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले आमदार गोरखे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून राज्यराजकारणात ओळखले जातात. आज विधान परिषदेत तालिका सभापती म्हणून बसण्याचा मान मिळाल्यावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेवर संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, "भारतीय जनता पक्ष हा नेहमीच तरुण, अभ्यासू, शिक्षित नेतृत्वाला संधी देतो. पिंपरी-चिंचवडसारख्या उद्योगनगरीतील सामान्य नागरिक, छोट्या समाजघटकांचा आवाज विधानमंडळात पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भाजपने दिलेल्या विश्वासाला मी पूर्ण न्याय देईन." तालिका सभापतीपदी विराजमान होताना त्यांनी आपले वडील कै. गणपतराव गोरखे यांचे स्मरण केले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आशीर्वादानेच आपण इथपर्यंत पोहोचल्याची भावना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीमध्येच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळू शकतो, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहराने आजवर राज्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते घडवले आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपद असले तरी, महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात प्रथमच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. ही निवड पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक ऐतिहासिक क्षण असून, संसदीय कार्यपद्धतीतील सर्वोच्च मानाच्या जागांपैकी एका पदावर आपला लोकप्रतिनिधी विराजमान होणे हे शहराच्या राजकीय परिपक्वतेचे प्रतीक आहे. विधान परिषदेचे तालिका सभापती हे सभेचे संचालन करणारी आणि शिस्त राखणारी व्यक्ती असते. संसदीय परंपरा, प्रक्रियात्मक शिस्त आणि तटस्थपणा या तिन्ही अंगांनी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अमित गोरखे यांची ही नियुक्ती केवळ शहरासाठीच नव्हे, तर समृद्ध महाराष्ट्रासाठी ऊर्जावान नेतृत्वाची दिशा दर्शवणारी ठरेल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या समाजाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

 Politics, Maharashtra, Legislative Council, Pimpri-Chinchwad, BJP, MLA, Parliamentary Affairs, Youth Leadership, Pune

 #MaharashtraPolitics #LegislativeCouncil #AmitGorkhe #PimpriChinchwad #BJP #ParliamentaryHistory #PuneNews #YouthLeadership #DevendraFadnavis

पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात प्रथमच! आमदार अमित गोरखे विधान परिषदेत तालिका सभापतीपदी (VIDEO) पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात प्रथमच! आमदार अमित गोरखे विधान परिषदेत तालिका सभापतीपदी (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०७:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".