हायवेवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

 


पुणे शहर, (३० जून): पुणे-बेंगलोर हायवेवर स्वर्णा हॉटेलशेजारील व्हिआरएल ट्रॅव्हल्स, वडगाव बुद्रुक येथे प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी हत्याराच्या मुठीने मारहाण करून मोबाईल, रोकड व सोन्या-चांदीचे दागिने जबरीने चोरणाऱ्या आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुरनं २७३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना ३० मे २०२५ रोजी घडली होती. फिर्यादी हे एका लाल रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये कोल्हापूरला जाण्यासाठी बसले होते. गाडी नवले ब्रिजवरून थोडी पुढे गेल्यानंतर गाडीतील चार इसमांनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज बळजबरीने काढून घेतला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पुणे-नवले ब्रिज महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे व निलेश भोरडे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील एक संशयित इसम भूमकर चौक, नऱ्हे येथे थांबला आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला असता, बातमीतील वर्णनाचा एक इसम तिथे थांबलेला दिसला. त्याला स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव निखील अरविंद पवार (वय २७, रा. रुम नं. १०१, पहिला मजला, मातोश्री अपार्टमेंट, वेताळनगर, आंबेगाव बु., पुणे) असे सांगितले.

निखील पवारकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्यातील दुसरा इसम बँक ऑफ महाराष्ट्र चौकाजवळ, नऱ्हे, पुणे येथे असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता, रोहन शाम पवार (वय २७, रा. जाधवर कॉलेज समोर, पाटील बिल्डिंग, तिसरा मजला, नऱ्हे, पुणे) हा संशयित इसम मिळून आला. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना २६ जून २०२५ रोजी अटक केली आहे.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ४,००,०००/- रुपये किमतीची हुंडाई कंपनीची आय २० फोर-व्हीलर गाडी आणि ३०,०००/- रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी  उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदीप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांनी केली.

Robbery, Crime, Arrest, Sinhgad Road, Pune Police, Law Enforcement 

 #PunePolice #RobberyArrest #SinhgadRoad #CrimeNews #PoliceAction #Pune

हायवेवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त  हायवेवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ७/०१/२०२५ ०५:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".