दुबईत राहून भारतात अमलीपदार्थाचे कारखाने चालवणाऱ्या कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळल्या; २५६ कोटींचा मुद्देमाल जप्त

 


  •  तब्बल १२६.१४१ किलोग्रॅम मेफेड्रॉन आणि .६४ कोटींची रोकड जप्त.  
  •  सांगली आणि सुरत येथील अंमली पदार्थ कारखान्यांचा पर्दाफाश.  

मुंबई, ११ जुलै २०२५: मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) मोठी कारवाई करत, दुबईमध्ये बसून भारतात मेफेड्रॉन (M.D.) अंमली पदार्थांचे कारखाने चालवणाऱ्या आणि त्याची निर्मिती विक्री करणाऱ्या मुख्य पाहिजे आरोपी मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला याला अखेर अटक केली आहे.  या प्रकरणात यापूर्वीच एकूण १३ आरोपींना (१२ पुरुष आणि महिला) अटक करण्यात आली होती.  

 घाटकोपर येथील अंमली पदार्थ विरोधी कक्ष- च्या पोलिसांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सयाजी पगारे चाळीजवळ, कुर्ला (), मुंबई येथे छापा टाकून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला अटक केली होती.  तिच्याकडून ६४१ ग्रॅम मेफेड्रॉन, १२.२० लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.  चौकशीदरम्यान, परवीन बानोने हा मेफेड्रॉन दुबईतील पाहिजे आरोपींच्या संपर्कात असलेल्या साजीद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डॅब्ज याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली.  पोलिसांनी साजीद शेखला अटक करून त्याच्या मीरा रोड येथील घरातून किलोग्रॅम मेफेड्रॉन आणि .६८ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.  

 तपासादरम्यान, पोलिसांनी दुबईतील पाहिजे आरोपींच्या संपर्कात राहून सांगली येथील मेफेड्रॉन तयार करण्याच्या कारखान्यात कच्च्या मालाचा पुरवठा करणारे आणि तयार झालेला अंमली पदार्थ खरेदी करून विक्री करणारे सुरत येथील दोन आरोपींनाही अटक केली.  तांत्रिक तपासाद्वारे दिनांक २५ मार्च २०२४ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाणे हद्दीतील इरळी गावात मेफेड्रॉन बनवणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई करत १२२.५०० किलोग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले.  

 या गुन्ह्यात एकूण १२६.१४१ किलोग्रॅम मेफेड्रॉन (अंदाजे किंमत २५२.२८ कोटी रुपये), .६४ कोटी रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, एक स्कोडा मोटार कार आणि एक मोटार सायकल असा एकूण २५६.४९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

मुख्य आरोपी मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (RCN) जारी करण्यात आली होती. त्यानुसार त्याला युनायटेड अरब अमिरात (UAE) येथून अटक करण्यात आले. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने प्रत्यार्पणांतर्गत त्याचा ताबा घेऊन मुंबईत आणले आणि गुन्ह्यात अटक केली.  पुढील तपास सुरु आहे.  

 ही  कामगिरी  कक्ष-, गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, घाटकोपर, मुंबई यांनी केली.  


 Drug Trafficking, Mumbai Police, Mephedrone, International Arrest, NDPS Act

 #MumbaiPolice #DrugBust #Mephedrone #InternationalCrime #NDPSAct #CrimeNews


दुबईत राहून भारतात अमलीपदार्थाचे कारखाने चालवणाऱ्या कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळल्या; २५६ कोटींचा मुद्देमाल जप्त दुबईत राहून भारतात अमलीपदार्थाचे कारखाने चालवणाऱ्या कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळल्या; २५६ कोटींचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ७/१४/२०२५ ०६:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".