ए एन एन न्यूज नेटवर्क
दिनांक २ जून २०२५
आजच्या बातम्या
जिओ-ब्लॅकरॉक भागीदारी: भारतीय वित्तीय
बाजारात मोठे बदल घडवणारे पाऊल
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ सर्वोत्कृष्ट, लघुपटात ‘थुनाई’ ठरला विजेता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
त्रिशताब्दी सोहळ्याची 'शिव महाआरती'ने सांगता
कोकण विभागस्तरीय पत्रकार कार्यशाळेत
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्यतांवर मंथन
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला
१४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!;
आता पाहूया सविस्तर बातम्या
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आर्थिक शाखा जिओ
फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी
ब्लॅकरॉक यांच्यातील या भागीदारीमुळे देशाच्या गुंतवणूक व्यवस्थापन उद्योगात मोठा
बदल होण्याची शक्यता आहे. मे २०२५च्या शेवटी सेबीने 'जिओ
ब्लॅकरॉक'ला म्युच्युअल फंड कामकाज सुरू करण्याची अंतिम परवानगी दिली. जुलै
२०२३मध्ये जाहीर करण्यात आलेली ही भागीदारी आता प्रत्यक्षात आली आहे. या ५०:५०
संयुक्त उपक्रमासाठी सुरुवातीला ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपची जिओ कंपनी तंत्रज्ञान आणि
व्यापक पोहोचीसाठी प्रसिद्ध आहे, तर न्यूयॉर्कस्थित ब्लॅकरॉक जागतिक मालमत्ता
व्यवस्थापनात आघाडीवर आहे.
पिंपरी चिंचवड
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा
मान मिळवला, तर तमिळ भाषेतील ‘थुनाई’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार
पटकावला. १ जून २०२५ रोजी या महोत्सवाचा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. या
महोत्सवात ४० देशांतील ९० हून अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि ६०
सेकंद फिल्म्स प्रदर्शित करण्यात आले. प्रियंका भेरिया यांना सर्वोत्कृष्ट
अभिनेत्रीचा आणि तुषार शिंगाडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पिंपरी
चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांनी संयुक्तपणे या
महोत्सवाचे आयोजन केले होते. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पुरस्कार
वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध पुरस्कारांनी
गौरविण्यात आले.यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष
लोखंडे, महापालिका उपआयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, लेखक
दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते.
रत्नागिरी
येथे कोकण विभागातील पत्रकारांसाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा नुकतीच पार
पडली, कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री डॉ.
उदय सामंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यावेळी त्यांनी कोकणाला कॅलिफोर्नियापेक्षाही
अधिक समृद्ध आणि प्रगतीशील बनवण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात
ज्याचे प्रधान सचिव तथा महासंचालक (माहिती व जनसंपर्क) ब्रिजेश सिंह आणि माहिती व
जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी माध्यमांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर
जोर दिला. ते म्हणाले की, माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम न करता समाजाचे
वैचारिक नेतृत्व करावे, सत्य आणि निष्पक्ष दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवावा. असे
बागुल म्हणाले. तर ब्रिजेश सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा
(Artificial Intelligence - AI) पत्रकारितेवरील प्रभाव या विषयावर विस्तृत
मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या पारंपरिक
सीमा आता विस्तारल्या आहेत. बातम्यांचे विश्लेषण करणे, डेटा जर्नलिझम, कंटेंट निर्मिती
आणि वितरण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एआयमुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
पत्रकारांनी या तंत्रज्ञानाचा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करत आपल्या
कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे,
बातमीपत्र
संपले
धन्यवाद
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२५ ०७:४३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: