पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित त्रिशताब्दी समारोहाची सांगता ३१ मे रोजी सायंकाळी भक्तिमय वातावरणात झाली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीचे संयोजक विजय (शीतल) शिंदे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी उपमहापौर केशव घोळवे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, जयनाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, कुंदा भिसे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, उपाध्यक्ष कैलास सानप, बिभीषण चौधरी, मंडलाध्यक्ष अनिता वाळुंजकर, संदेश काटे, माजी मंडलाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोंडवे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, गणेश वाळुंजकर, गणेश आर. ढाकणे, मनोज ब्राम्हणकर, अभिजित बोरसे, भुषण जोशी, सत्यनारायण चांडक, सीमा चव्हाण, ज्ञानेश्वर हांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण केले आणि उपस्थितांचे आभार मानले.
भाजप प्रदेश कार्यालयातर्फे प्रत्येक जिल्हास्थानी कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय (शीतल) शिंदे यांनी केले आणि आभार मोरेश्वर शेडगे यांनी मानले.
---------------------------------------------------------------------------------------------------------- #AhilyadeviHolkar #PimpriChinchwad #Maharashtra #BJP #Celebration #SocialEvent #ShivMahaAarti #300thAnniversary
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०४:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: