पिंपरी चिंचवड: सांगवी परिसरात एका व्यक्तीची 'FYERS PickStrategy' या व्हॉट्सॲप ग्रुप आणि 'एच.एन.डब्ल्यु.ए.सी.सी' या ट्रेडींग ॲपच्या माध्यमातून ३२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी समीर श्रीपाद आपटे (वय ५५ वर्ष, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये 'FYERS PickStrategy' या व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिनधारक आणि व्हॉट्सॲप नंबर ७०५८२७६६३७, ९१०९४५०७४८ व ८४२७०६१०१९ (शेरॉन त्रिवेदी या नावाने असलेल्या) धारक, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया (खाते क्रमांक ५७७२६८९५९५, ५७०४०७८६७५, ३७६६१२२१६५), आय.डी.एफ.सी. बँक (खाते क्रमांक १०२२६६०३१९१) आणि बंधन बँक (खाते क्रमांक २०१०००४८८६०७५१) यांचे खातेधारक यांचा समावेश आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दि. १८/०५/२०२५ पासून ते ०४/०६/२०२५ रोजी पर्यंत पिंपळे सौदागर, पुणे येथील फिर्यादींच्या राहत्या घरी ही फसवणूक झाली. आरोपींनी 'FYERS PickStrategy' या व्हॉट्सॲप ग्रुप आणि 'एच.एन.डब्ल्यु.ए.सी.सी' या ट्रेडींग ॲपच्या माध्यमातून फिर्यादींना ३२,००,०००/- रुपये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी सांगवी स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १८५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) (फसवणूक), ३१६ (२) (विश्वासघात) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक बनसोडे करत आहेत.
- -----------------------------------------------------------------------------------------------------
- Cyber Crime, Online Fraud, Investment Scam, Pimpri Chinchwad, Sangvi, Financial Crime
- #OnlineFraud, #InvestmentScam, #PimpriChinchwad, #SangviCrime, #CyberCrime
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२५ ०८:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: