पुणे: जुना बाजार रेल्वे भराव, मंगळवार पेठ येथे डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या व्यक्तींनी एका तरुणाला भेटण्यास बोलावून हत्याराचा धाक दाखवून ६० हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर दोघे फरार आहेत.
या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने (वय ३३ वर्षे, रा. नारायण पेठ, पुणे) तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये वाहिद रज्जाक शेख (वय १९ वर्ष, रा. जुना बाजार, रेल्वे भराव, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली असून, इतर दोन इसम अद्याप फरार आहेत.
दि. ०९/०६/२०२५ रोजी सायंकाळी ०६:३५ वाजण्याच्या सुमारास जुना बाजार, मंगळवार पेठ, पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी त्यांच्या मोबाईलमध्ये 'वाल्ला' ॲपमध्ये डेटिंग आणि मीटिंगसाठी चॅटिंग करत असताना, नमूद आरोपींशी त्यांची ओळख झाली. आरोपींनी फिर्यादीला भेटण्यास बोलावून हत्याराचा धाक दाखवला, मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला, शिवीगाळ करून मारहाण केली आणि मोबाईलमधील फोन पेचा पासवर्ड विचारून फिर्यादीच्या खात्यातून ६०,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
या प्रकरणी फरासखाना स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ११३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) (जबरी चोरी), ११५ (२) (गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन), ३५२ (गैरहल्ला), ३५१ (२) (३) (हल्ला), ३ (५) (गुन्हेगारी कट) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक शितल जाधव करत आहेत.
- --------------------------------------------------------------------------------------------------------------------Crime, Robbery, Online Dating Scam, Digital Theft, Faraashkhana, Pune, Arrest
- #PuneCrime, #Robbery, #DatingAppScam, #DigitalTheft, #Faraashkhana
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०८:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: