पिंपरी चिंचवड: शिरगाव येथील चांदखेड गावाच्या हद्दीत कंजारभटट वस्तीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी हवालदार रितेश माणिक कोळी (वय १६६४, शिरगाव परंदवडी स्टेशन) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी एक महिला आरोपी (वय ३० वर्ष, रा. कंजारभटट वस्ती, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) हिला अटक करण्यात आली आहे.
दि. १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी ०५:३५ वाजण्याच्या सुमारास मौजे चांदखेड गावच्या हद्दीत कंजारभटट वस्तीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत, ता. मावळ, जि. पुणे येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे १,००० लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन असा एकूण ३९,०००/- रुपये किमतीचा प्रोव्हिजनचा माल बेकायदेशीररित्या भिजत घालताना मिळून आली.
या प्रकरणी शिरगाव स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १५३/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) (अवैध दारू निर्मिती व विक्री) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास हवालदार कोकतरे करत आहेत.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------------Illegal Liquor, Distillery, Seizure, Arrest, Pimpri Chinchwad, Shirgaon, Crime
- #IllegalLiquor, #ShirgaonCrime, #PimpriChinchwad, #Arrest, #Distillery
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०८:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: