शिवाजीराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वरवाडी, पाषाण येथे भव्य रक्तदान शिबिर; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 


सोमेश्वरवाडी: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने सोमेश्वर मंदिर प्रांगण, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने तरुण मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, मानवतेला मानवंदना म्हणून तब्बल ११०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. "सनी निम्हण गेली पाच वर्षांपासून सातत्याने शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. रक्तदानासारखं पुण्याचं कार्य दुसरं काही नाही. रक्त हे तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान हाच रक्ताचा एकमेव स्रोत आहे. म्हणूनच हे फार मोठं आणि पवित्र कार्य आहे. सनी विनायक निम्हण यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात एक चांगला संदेश गेला असून, रक्तदानासारख्या पवित्र कार्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळाली आहे," असे म्हणत त्यांनी सनी निम्हण यांच्या मौल्यवान योगदानाचे मनापासून कौतुक केले.

याप्रसंगी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, वसंतराव जुनवणे, शहाजी रानवडे, सुहास निम्हण, सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, खंडूशेठ आरगडे, ज्ञानेश्वर पारखे, मनोहर आरगडे, शांताराम महाराज निम्हण, पांडुरंगअप्पा दातार, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, सुप्रीम चोंधे, गिरीश जुनवणे, रणजीत कलापुरे, हेरंब शेळके, विशाल शिंदे, सचिन वाडेकर, जयप्रकाश निम्हण, अशोक दळवी, भरत जोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


A grand blood donation camp was organized by former corporator Sunny Vinayak Nimhan at Someshwarwadi, Pashan, on Shivrajyabhishek Din, inaugurated by Minister Chandrakantdada Patil, witnessing 1104 blood donors.

 #Pune #BloodDonation #ShivrajyabhishekDin #SunnyNimhan #ChandrakantPatil #SocialInitiative #Someshwarwadi #Pashan #BloodDonationCamp

शिवाजीराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वरवाडी, पाषाण येथे भव्य रक्तदान शिबिर; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन शिवाजीराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वरवाडी, पाषाण येथे भव्य रक्तदान शिबिर; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन Reviewed by ANN news network on ६/०८/२०२५ ०६:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".