पुणे: लोणी काळभोर येथील पुणे-सोलापूर रोडवर भरधाव टेम्पोच्या धडकेने एका ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात घडवल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०५/२०२५ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास जगदंबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, कदमवाक वस्ती, जुनी ग्रामपंचायत समोरील पुणे-सोलापूर रोडवर, ता. हवेली, जि. पुणे येथे हा अपघात घडला. विठ्ठल कांबळे (वय ६३ वर्षे, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलगा सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३ वर्षे, रा. पांढरे मळा, वागले निवास, तुकाई मंदिराजवळ, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) हा मोटारसायकलवरून जात असताना, एका अज्ञात टेम्पोवरील चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात टेम्पो चालवला. त्याने सुरेशच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे सुरेश गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात घडवून चालक टेम्पोसह फरार झाला आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करत आहेत. आरोपी टेम्पो चालकाचा शोध सुरू आहे.
- -----------------------------------------------------------------------------------------------------------#FatalAccident, #HitAndRun, #LoniKalbhor, #PuneAccident, #RoadSafety
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०४:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: