पिंपरी चिंचवड: महाळुंगे एमआयडीसी येथील बिंद्रा इंडस्ट्रीज कंपनीमध्ये एका ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून त्यात बुडून अडीच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ जुलै २०२२ रोजी घडली असली तरी, गुन्हा मात्र ५ जून २०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे.
कु. तापसी सोनु सिरसवाल (वय २.५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती कंपनीत वॉचमन म्हणून काम करणारे सोनु सिरसवाल यांची मुलगी होती.खेळत असताना त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून बुडून तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी राकेश उदेसिंग गुमाने (वय ४० वर्षे), सहायक पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून, ठेकेदार विशाल सोनावणे (नाव व पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७/०७/२०२२ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास मौजे निघोजे गावच्या हद्दीत, बिंद्रा इंडस्ट्रीज कंपनीमधील लिफ्टच्या खड्ड्यामध्ये हा अपघात घडला. कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करणाऱ्या ठेकेदाराने लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्याला कंपाउंड किंवा आडोसा केला नाही. अशा उघड्या खड्ड्यात व्यक्ती किंवा कोणीही पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू होऊ शकतो, हे माहिती असतानाही ठेकेदाराने कोणतीही खबरदारी घेतली नाही.
- ------------------------------------------------------------------------------------------------------#ChildSafety, #Negligence, #IndustrialAccident, #PimpriChinchwad, #Accident
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२५ ०४:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: