अनधिकृत फ्लेक्स आणि वीजचोरीमुळे जीवघेणा अपघात; समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे: नानापेठ येथील आंदेकर चौकात अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या एका फ्लेक्सला विजेचा धक्का लागून ८ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिला वाचवण्यासाठी गेलेला ११ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शिवम उदयकांत आंदेकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कै. उदयकांत आंदेकर यांचा मुलगा शिवम उदयकांत आंदेकर (रा. नानापेठ, पुणे) आणि त्याचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ०१/०६/२०२५ रोजी नानापेठ, डोके तालीम जवळ, पुणे येथे ही घटना घडली. ८ वर्षांची मुलगी तिच्या घराजवळ आंदेकर चौकात खेळत असताना, ‘माजी लोकप्रिय नगरसेवक स्वर्गीय उदयकांतजी आंदेकर चौक’ नावाच्या लोखंडी फलकाला विजेचा धक्का लागला. पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता हा फलक उभा करण्यात आला होता आणि बाजूच्या फुटपाथवरील इलेक्ट्रिक खांबामधून विनापरवाना व निष्काळजीपणाने इलेक्ट्रिक सप्लाय घेण्यात आला होता. यामुळे फलकाच्या पोलमध्ये करंट उतरला आणि मुलीचा त्याला हात लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी गेलेला ११ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला.

या घटनेची चौकशी झाल्यानंतर डॉक्टरांच्या अहवालात मुलीचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, समर्थ स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजिस्टर नंबर ४७/२०२५ बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे दि. ०२/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, दि. १०/०६/२०२५ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२५ देखील दाखल करण्यात आला.

तसेच, अनाधिकृत व बेकायदेशीर फलक लावून इलेक्ट्रिक पोलवरून वीज चोरी केल्याप्रकरणी संबंधित विभागाने समर्थ स्टेशनमध्ये तक्रार दिल्याने, शिवम उदयकांत आंदेकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध समर्थ स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२५ भारतीय विद्युत कायदा कलम १३५ प्रमाणे दि. १०/०६/२०२५ रोजी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

  • ====================================================
  • Accident, Electric Shock, Child Death, Illegal Structure, Electricity Theft, Pune, Police Action
  •  #PuneAccident, #ElectricShock, #ChildSafety, #IllegalFlex, #ElectricityTheft, #PunePolice
अनधिकृत फ्लेक्स आणि वीजचोरीमुळे जीवघेणा अपघात; समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल अनधिकृत फ्लेक्स आणि वीजचोरीमुळे जीवघेणा अपघात; समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०९:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".