लोहगडावरील केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नाही तर ठरवून केलेला खून; होणारी पत्नी सिया गोयल मित्रासह गजाआड
१७ कोटींचे पॅलेस बुकिंग आणि २ विमाने; 'बिग फॅट वेडिंग' आधीच नवरदेवाचा लोहगडावरून ढकलून क्रूर अंत, नवरीच निघाली सूत्रधार
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, पुण्याच्या गहंजे भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा २४ वर्षांचा तरुण मुलगा केतन अग्रवाल हा परदेशातून शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या व्यवसायात संचालक (डायरेक्टर) म्हणून रुजू झाला होता. त्याचे लग्न पुण्याच्या मार्केटयार्ड भागातील मसाल्यांचे प्रसिद्ध व्यापारी गोयल यांच्या कन्या सिया गोयल हिच्याशी निश्चित झाले होते. जयपूरच्या एका आलिशान पॅलेसमध्ये १७ कोटी रुपयांचे वेन्यू बुकिंग आणि पाहुण्यांसाठी दोन विशेष विमाने आरक्षित करून या बिग फॅट वेडिंगची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, सियाला केतन नवरा म्हणून पसंत नव्हता. केवळ घरच्यांच्या दबावाखाली येऊन तिने या लग्नाला होकार दिला होता आणि मनातल्या मनात केतनला कायमचे संपवण्याचा कट रचला होता.
१८ जून रोजी आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सियाने केतनकडे लोहगड ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट धरला. सकाळी गडावर पोहोचल्यानंतर साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते हत्ती तलावाजवळील एका कड्यावर गेले. तिथे फोटो काढण्याच्या बहाण्याने सियाने आधीच पाठलाग करत गडावर पोहोचलेल्या आपल्या मित्राच्या मदतीने केतनला कड्यावरून खाली ढकलून दिले. केतन दरीत कोसळल्यानंतर प्रियकर मित्र तिथून पसार झाला, तर सियाने स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडे धाव घेत केतनचा पाय घसरून अपघात झाल्याचा बनाव रचला. पोलीस आणि रेस्क्यू टीमने दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आल्याने त्याच रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू ठेवला. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एका संशयित मुलाची हालचाल आढळली. तीव्र ऊन असतानाही त्या मुलाने अंगात फुडी घातली होती, हेडफोन लावले होते आणि तो आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत केतन आणि सियाच्या गाडीचा पाठलाग करत होता. संशय बळावल्याने तपास अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवरचा लोकेशन डेटा आणि कॉल डिटेल्स (CDR) तपासले. त्यावरून सिद्ध झाले की, त्या हुडी घातलेल्या मुलाचे लोकेशन आणि प्रवास हुबेहूब केतन-सियाच्या मार्गावरच होता. हा मुलगा दुसरा कोणी नसून सियाचा जवळचा मित्र (प्रेमसंबंध असलेला प्रियकर) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या कडक चौकशीत सियाने घरच्यांच्या दबावामुळे हा कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.
Labels: Lohagad Murder Case, Pune Crime News, Ketan Agrawal Case, Siya Goyal Arrested, Lonavala Rural Police, Big Fat Wedding Murder.
Search Description: In a shocking revelation, Lonavala Rural Police arrested Siya Goyal and her friend for murdering her fiance Ketan Agrawal by pushing him off Lohagad fort cliff.
Hashtags: #LohagadMurder #PuneCrime #KetanAgrawal #SiyaGoyal #LonavalaGRP #CCTVInvestigation #CrimeNews #BigFatWedding
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: