हडपसर पोलिसांकडून सायबर फसवणुकीतील २९.७६ लाखांहून अधिक रक्कम फिर्यादींना परत

 


पुणे: पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांनी केलेल्या वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील २९ लाख ७६ हजार ८२२/- रुपये रक्कम फिर्यादींना परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम संबंधितांना परत करण्यात आली.

पुणे शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांकडून सोशल मीडिया ॲपद्वारे संपर्क साधून शेअर्स ट्रेडिंग, हॉटेल रेटिंग टास्कमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून, डिजिटल अटकेची भीती दाखवून पैसे उकळणे, तसेच फेड एक्स कुरिअर, एमएनजीएल गॅस बिल भरणे, पीएम किसान ॲप लिंक अशा विविध प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल होते.

या प्रकरणांमध्ये उप आयुक्त (परिमंडळ-५) डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, अंमलदार सचिन गोरखे, तेजस पांडे आणि गायत्री पवार यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. फिर्यादींचे पैसे ज्या बँक खात्यांमध्ये गेले होते, त्या बँक नोडल अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पाठपुरावा करून फिर्यादींची गेलेली रक्कम बँक खात्यांमध्ये गोठवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाने ही २९,७६,८२२/- रुपये रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात हडपसर स्टेशनला यश आले.

ही कामगिरी अपर आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उप आयुक्त (परिमंडळ-५) डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त (हडपसर विभाग) अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, अंमलदार सचिन गोरखे, तेजस पांडे, गायत्री पवार यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

  • ----------------------------------------------------------------------------------------
  • Cyber Crime, Online Fraud, Financial Recovery, Hadapsar, Pune, Police Action
  •  #CyberCrime, #OnlineFraud, #FinancialRecovery, #HadapsarPolice, #PunePolice
हडपसर पोलिसांकडून सायबर फसवणुकीतील २९.७६ लाखांहून अधिक रक्कम फिर्यादींना परत हडपसर पोलिसांकडून सायबर फसवणुकीतील २९.७६ लाखांहून अधिक रक्कम फिर्यादींना परत Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०९:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".