गणेश पेठ मच्छी मार्केटमधील खंडणी रॅकेटचा पर्दाफाश; फरासखाना पोलिसांची कारवाई

 


पुणे: फरासखाना पोलिसांनी गणेश पेठ मच्छी मार्केटमधील एका व्यापाऱ्याकडून सन २०१६ पासून ४८ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आणि अलीकडेच ९० हजार रुपये किमतीचा मासे व्यवसायाचा माल जबरदस्तीने घेऊन गेल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने (मासे व्यावसायिक) तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये शिवम उदयकांत आंदेकर (वय २९ वर्षे, रा. डोके तालीम मागे, नाना पेठ, पुणे) आणि आकाश सुरेश परदेशी (वय २८ वर्षे, रा. लोहियानगर, पुणे) यांचा समावेश आहे. आरोपी आंदेकर याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून, आकाश परदेशीलाही अटक करण्यात आले आहे.

दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६ पासून आरोपी शिवम आंदेकर याने फिर्यादींना गणेश पेठ मच्छी मार्केटमधील सरकारी जागेवर व्यवसाय करण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. एप्रिल-२०२५ पर्यंत त्याचा हस्तक आकाश परदेशी याच्याकरवी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने अंदाजे ४८ लाख रुपये खंडणीपोटी वसूल केले. एप्रिल-२०२५ पासून फिर्यादींनी आर्थिक अडचणीमुळे हप्ता देण्यास असमर्थता दाखविल्यावर, मे-२०२५ मध्ये त्यांना परत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या धमकीनंतर, फिर्यादींच्या दुकानातील ९०,०००/- रुपये किमतीचा मासे व्यवसायाचा माल ४ ते ५ गुंडांकरवी त्यांच्या अपरोक्ष बाहेर फेकून दिला. फिर्यादी हे सामान घेण्यासाठी गेले असता, त्यांना ते सामान न देता जबरदस्तीने टेम्पोमध्ये घालून घेऊन गेले. या प्रकारानंतर फिर्यादींनी वेळोवेळी सदर सामान परत करणेबाबत आणि व्यवसाय करू देणेबाबत विनंती केली, परंतु त्यांना व त्यांच्या पत्नीला अपमानित करून हाकलून देण्यात आले.

या लेखी तक्रारीवरून फरासखाना स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा क्रमांक १०८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (८)(४) (खंडणी), ३९० (८) (दरोडा), ३४९ (३) (हल्ला), ३ (४) (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उप आयुक्त (परिमंडळ-१, अतिरिक्त कार्यभार) आणि उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त (फरासखाना विभाग) अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहाय्यक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि फरासखाना स्टेशनमधील अंमलदार यांनी केली आहे.

  • ------------------------------------------------------------------------------------------------------------------- Crime, Extortion, Robbery, Arrest, Pune, Police Action, Business Fraud
  • #PuneCrime, #Extortion, #Robbery, #Arrest, #FaraskhanaPolice
गणेश पेठ मच्छी मार्केटमधील खंडणी रॅकेटचा पर्दाफाश; फरासखाना पोलिसांची कारवाई गणेश पेठ मच्छी मार्केटमधील खंडणी रॅकेटचा पर्दाफाश; फरासखाना पोलिसांची कारवाई Reviewed by ANN news network on ६/०८/२०२५ ०४:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".